You are currently viewing शिवशंकर

शिवशंकर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिवशंकर*

 

शिव शंकरा करुणाकरा

कर्पूरगौरं भुजगेंद्रहारं दयाधना !!धृ!!

 

जटाधारी मस्तकी गंगा,

कंठी नागनाथ भस्म अंगा,

अर्धचंद्र शोभे कपाळी विश्वेश्वरा !!१!!

 

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा

कैलासपती तो शिव भोळा

सदाशिवाचा पूर्णावतार रुद्रेश्वरा !!२!!

 

त्रिशूळ डमरू धरे हाती

रुद्र नामे तम् दुःख हरती

संहाराचा अधिपती महेश्वरा !!३!!

 

शिव म्हणती कल्याणकारी

लय प्रलय तुझ्या आहारी

प्रक्षुनी विष कंठनीळा विषधरा !!४!!

 

रावण शनी कश्यप भक्त

शिव सर्वां प्रती आसक्त

महादेव नाव प्रिय हे चंद्रशेखरा !!५!!

 

(दिपी)✒️

दीपक पटेकर, सावंतवाडी.

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा