जिल्हाधिकारी यांना वर्षपूर्तीनिमित्त महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा

जिल्हाधिकारी यांना वर्षपूर्तीनिमित्त महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा

निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिल्या शुभेच्छा!

सिंधुदुर्गनगरी

गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी म्हणून कोरोणा सारख्या संकटाला समर्थपणे तोंड देत महसूल प्रशासकीय कामकाजात नागःरिक, लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी सलोख्याचे संबंध, जिल्ह्याचा कारभार यशस्वीपणे हाताळला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांना शुभेच्छा दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर एक वर्ष झाले या वर्षपूर्ती बद्दल महसूल प्रशासन, सामान्य प्रशासनाचे वतीने निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी तहसीलदार सुधीर पाटील, नायब तहसीलदार दर्शना चव्हाण, विजय वरक व कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती घेतल्यानंतर के मंजू लक्षमी जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर एक वर्ष झाले यानंतर पालकमंत्र्यांच्या विविध बैठका शासकीय बैठका कोरोणा सारख्या महामारी समस्या समर्थपणे तोंड देत सर्व लोकप्रतिनिधी नागरिक यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून जिल्ह्याचा कारभार हाताळला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महसूल अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे सत्यवान माळवे यांनीही शुभेच्छा दिल्या मार्च 20 20 पासून कोरोणा चे लॉक डाऊन झाले त्यावेळची परिस्थिती त्यानी कौशल्यपूर्वक हाताळून लोक डाऊन काळात परराज्यातील मजुर कामगार रेल्वेद्वारे स्वगृही पोहोचलेल्या चे तसेच सुविधा आरोग्यविषयक उपक्रम निवास व्यवस्था यावर भर दे सिंधुदुर्ग जिल्हा देशात ग्रीन झोन मध्ये ठेवण्यात यश मिळवले कोरोणा काळात यशस्वीपणे निर्णय भूमिका बजावण्याचे काम केले आज जिल्हाधिकारी पदावर एक वर्ष झाल्याने महसूल आणि सामान्य प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा