You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांचे मनःपूर्वक आभार रस्त्यावरील धोकादायक तो मोठा खड्डा त्वरित बुजवला.

सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांचे मनःपूर्वक आभार रस्त्यावरील धोकादायक तो मोठा खड्डा त्वरित बुजवला.

सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांचे मनःपूर्वक आभार रस्त्यावरील धोकादायक तो मोठा खड्डा त्वरित बुजवला.

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांनी सामाजिक बांधिलकीच्या मागणीची दखल घेऊन लक्ष्मीनगर येथील रस्त्यावर पडलेला मोठ्ठा खड्डा काही तासातच बुजवला चार वर्षाचा प्रश्न चार तासातच मिटला.
सामाजिक बांधिलकीच्या वतीने मनोज राऊळ यांचे मनःपूर्वक आभार सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष श्री सतीश बागवे यांनी मानले आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सतीश बागवे , उपाध्यक्ष श्री शैलेश नाईक ,कार्याध्यक्ष श्री संजय पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, हेलन निबरे ,समीरा खलील व अन्य सहकारी सावंतवाडी शहरांमध्ये स्वतःचा वेळ व पैसा खर्च करू शंभर टक्के समाजसेवा करत आहे. खास करून हॉस्पिटल क्षेत्रामध्ये हे कार्यकर्ते दिवसातून तीन तास सेवा पुरवतात.
एखाद्या वेळी अपघात घडल्यास पेशंट व नातेवाईक यांचे काय हाल होतात हे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम पाहत असतात.
म्हणूनच झिरो टक्के अपघात मुक्त सावंतवाडी शहर बनवण्याचे मिशन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने हाती घेतले आहे आणि त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे जे काम हाती घेतले ते पूर्ण केल्याशिवाय सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते शांत बसत नाही याच गोष्टीचे कौतुक सदर प्रतिष्ठानचे होत आहे.
या सेवाभावी उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे अमित सावंत तसेच विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ व कॉन्ट्रॅक्टर दादा नग्नूर व त्यांचे सहकारी यांचे लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा