आंगणेवाडी येथील भराडी माता जत्रेतील सिंधुदुर्ग पोलिसांचे सुयोग्य कामगिरी केल्याबद्दल मानले धन्यवाद
कुडाळ
पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांची काल भेट घेऊन कुडाळ येथील जेष्ट नागरिकांचा 100% यशस्वी महामेळावा अन आंगणेवाडी येथील भराडी माता जत्रेतील सिंधुदुर्ग पोलिसांचे सुयोग्य अन नेत्रदीपक कामगिरी, जेष्ट नागरिक कक्ष।ची स्थापना याबाबत ऋण अन आभार व्यक्त करताना जेष्ट नागरिक जिल्हा समन्वयक सर्वश्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर, जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे,जेष्ट पत्रकार,सल्लागार अशोक करंबेळकर,जिल्हा सचिव सखाराम सपकाळ,सर्वांचे सत्कार करताना सदरक्षणाय, खलनिग्रणाय मा पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांचे आभार मानले.