You are currently viewing राष्ट्रीय तंबाखू मुक्ती जागरुकता मोहीम संपन्न  

राष्ट्रीय तंबाखू मुक्ती जागरुकता मोहीम संपन्न

राष्ट्रीय तंबाखू मुक्ती जागरुकता मोहीम संपन्न  

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील आंगणेवाडी श्री देवी भराडी माता यात्रा प्रसंगी, तंबाखू नियंत्रणाचे महत्त्व वाढवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, भारत सरकारच्या “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम” (NTCP) अंतर्गत, राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्र, सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजी (सीसीई), टाटा मेमोरियल सेंटर (टीमसी), युनिट ऑफ एटॉमिक इनर्जिकेंद्र, भारत सरकार, मुंबई व जिल्हा आरोग्य विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्ती सेवा केंद्राची जागरूकता मोहीम संपन्न झाली, असल्याची माहिती जिल्ह शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्र (NTQLS) हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. जो तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल जनजागृती वाढविणे आणि तंबाखू मुक्तीसाठी मदत करणे यावर केंद्रित आहे. टोल फ्री नंबर १८००११२३५६ वर कॉल करून, व्यक्तींना तंबाखू मुक्तीसाठी मार्गदर्शन, सल्ला आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातात. या केंद्राच्या मदतीने, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल जनजागृती वाढविणे आणि तंबाखू मुक्तीसाठी मदत करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. केंद्र हे टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, खरघर येथे कार्यरत असून या केंद्राची पाहणी डॉ. सुदीप गुप्ता डायरेक्टर टीमसी, मुंबई डॉ. पंकज चतुर्वेदी, एक्ट्रेक डायरेक्टर, डॉ. राजेश दिक्षित, सीसीई डायरेक्टर आणि डॉ. अतुल बुडुख, प्राध्यापक, सीसीई, टीमसी, मुंबई करत आहेत. या केंद्रावर कॉल केल्यास मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये समुपदेशन केले जाते. राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्र (NTQLS) च्या कार्य वेळा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत आहेत. तसेच सोमवार वगळता इतर सर्व दिवसांमध्ये हे केंद्र कार्यरत असते.

हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या डॉ. नागनाथ मुडम, साय्यक संचालक (असंर्गजन्य रोग) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडलायात तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली, आणि तंबाखू मुक्ती सेवा केंद्राचा टोल फ्री नंबर १८००११२३५६ वर कॉल केल्यास तंबाखू, बीडी, सिगारेटचे सेवन सोडण्यासाठी सहज मदत मिळते. तसेच ते विनामूल्य आहे, असे आवाहन करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, यांनी या उपक्रमाची पाहणी केली आणि राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्राच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी या उपक्रमामुळे कोकण प्रदेशातील ग्रामस्थांना मोठा लाभ होईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा अरोग्य अधिकारी  डॉ. संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  शाम पाटील, निवासी वै‌द्यकीय अधिकारी डॉ. सुभोध इंगळे, श्री. संतोष खानविलकर, जिल्हा सल्लागार (NTCP), कार्मिस अल्मेडासोशलवर्कर, (NTCP), जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग, आणि सचिन आंगणे (असिस्टन सुपरवाईजर) फील्ड इन्व्हेस्टिगेटर, कुलभूषण शिरसाट, निलेश तेली, मयुरेश कदम, अमित गावडे, रोहित गावडे, संकेत धारपवार, सागर नारकर पॉप्युलेशन बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री (PBCR) टीम, सिंधुदुर्ग जिल्हाटीमसी, मुंबई व श्री. कदम, वरीष्ठ संशोधन समन्वयक संतोष खरमाळे, प्रशासकीय सहायक श्री. खरात, समुपदेशक, राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्र, सीसीई, टीमसी, युनिट ऑफ एटॉमिक इनर्जिकेंद्र, भारत सरकार, मुंबई टीम यांनी एकत्र येऊन नागरिकांना तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या धोक्याविषयी जागरुक केले. श्री देवी भराडी माता यात्रा दरम्यान तंबाखू विरोधी विविध घोषणांसह 48 तंबाखू विक्री स्टॉल, लहान गोडव्याचे दुकाने आणि खाद्यपद्धतींचे हॉटेल्स, सरकारी परिवहन विभागातील ड्रायव्हर्स आणि टिकीट वितरण कर्मचारी, पोलिस, होमगार्ड्स आणि इतर स्थानिक ग्राम सदस्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली.

या सोहळ्यात आंगणेवाडी कुटुंब, ग्रामपंचायत सदस्य, आंगणेवाडी यांनी या उपक्रमांचे जाहीर आभार मानले. यामुळे, लाखो भक्त यामध्ये सहभागी होऊन तंबाखूच्या धोक्यापासून मुक्त होण्याचा संकल्प करतील आणि राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्राची जनजागृती होण्यास मदत होईल तसेच सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू मुक्त होईल अशी आशा व्यक्त केली.

००००

 साहित्याची दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोडाघाट या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची आहे.  साहित्य ज्या खरेदीदारास विकत घ्यावयाचे आहे, त्यांनी या कार्यालयात दि. 5 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद दरपत्रक लिफाप्यात सादर करण्याचे आवाहन फोडाघाटचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  बो.सोनावणे यांनी केले आहे.

            निविदेच्या बंद लिफाप्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा दि. 5 मार्च 2025 नंतर आलेल्या निविदांच्या स्विकार केला जाणार नाही. निविदा दि. 6 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता उघडण्यात येतील सदर विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 10.30 ते 5 वाजेपर्यंत पाहता येतील. निर्लेखित जडसंग्रह साहित्य हे आहे त्या स्थितीत आपल्या स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करावी.

अटी पुढीलप्रमाणे, ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरह साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजूर होईल त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरुन साहित्य स्वखचाने घेवून जावा लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा विक्री रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा नाकारणेचा अधिकार निम्रश्वक्षरी कारांनी राखून ठेवले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा