वाभवे – वैभववाडी नं.पं. च्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या श्रध्दा रावराणे यांची बिनविरोध निवड
वैभववाडी
वाभवे – वैभववाडी नगरपंचयातीच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या सौ. श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपंचायत मध्ये १७ पैकी १६ नगरसेवक हे भाजपाचे आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार नगरसेविका श्रद्धा रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी काम पहिले. सकाळी ११ वाजता वाभवे – वैभववाडी नगरपंचयातीच्या नगराध्यक्ष पदीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजप उपजिल्हाध्यक्ष प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, बंड्या मांजरेकर, सर्व नगरसेवक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.