शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू- आ. वैभव नाईक

शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू- आ. वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा व विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सीमीटर वाटप

आ.वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून उपक्रम

महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारी पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु होत असताना एकाही शिक्षकाला कोरोना होता नये यासाठी त्यांची तपासणी व्हावी. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने शाळा व विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सीमीटर वाटप करण्यात आले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करताना ज्या काही अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी आपण सर्वोतपरी सहकार्य करू.अशी ग्वाही कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिली
कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा व विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सीमीटरचे वाटप करण्यात आले. कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात गुरूवारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आमदार वैभव नाईक बोलत होते.


आ.वैभव नाईक पुढे म्हणाले, कोरोना कालावधीत शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग घेतले. विद्यार्थ्यांनाही त्याला चांगला प्रतिसाद दिला हे कौतुकास्पद आहे. कोरोनावर लस आली आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका,पण काळजी घ्या मास्क सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या असे सांगत प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. माध्यमिकच्या सर्व शाळाहि दोन वर्षात डिजिटल करू असे आ.वैभव नाईक यांनी आश्वासित केले.


जि. प. गटनेते नागेंद्र परब म्हणाले, गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासन, आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. आमदार वैभव नाईक यांनी ख-या अर्थाने आपल्या मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारले व ते यशस्वीरीत्या निभावले आहे.मतदारसंघातील लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी शर्तींनीशी प्रयत्न केले आहेत.राज्यात सर्व प्रथम त्यांनी आमदार निधीतुन लोकांना मास्क व रूग्णालयातील आवश्यक उपकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. मालवणला डायलेसीस सेंटर मालवण, हिर्लोकला रुग्णवाहिका दिली.आता शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीमीटरचे व थर्मलनगची आवश्यकता ओळखून त्यांनी शाळांची हि गरज देखील पूर्ण केली आहे. नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आ.वैभव नाईक तत्पर असतात. शालेय बसफेरी सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.असे सांगत आ.वैभव नाईक यांच्या तत्पर व कार्यकुशलते बाबत नागेंद्र परब यांनी गौरोद्गावर काढले.


अमरसेन सावंत म्हणाले, आ. वैभव नाईक हे स्वतः पाॅझिटिव्ह झाले तरीही इतर रूग्ण तसेच नागरिकांच्या समस्या सोडवविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून ते कोरोना योद्धा ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. जयभारत पालव यांनीही मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापक शिक्षक यांच्याकडून आमदार वैभव नाईक यांनी शैक्षणिक अडचणी समजून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी ग्रामीण भागामध्ये एसटी फेऱ्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात कोविडच्या २०० आरटीपीसीआर टेस्ट होत आहेत. शिक्षकांच्या कोविड टेस्ट करण्याच्या दृष्टीने टेस्ट ची संख्या वाढविणे व अँटीजेन रॅपिड टेस्ट याबाबत आरोग्य विभागाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जि.प.गटनेते नागेंद्र परब, उपसभापती जयभारत पालव, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, राजू कविटकर, जि.प.चे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई राजन नाईक, श्रेया परब, मंदार शिरसाट, मिलिंद नाईक एसटीचे आगार प्रमुख श्री.डोंगरे, व मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सुर्यभान गोडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा