You are currently viewing शंकर दत्ताराम आडेलकर यांचा प्रामाणिकपणा गरीब भाजी विक्रेती वृद्ध महिला साई शेळके हिची रस्त्यात पडलेली 14 हजार रुपयाची रक्कम परत केली.

शंकर दत्ताराम आडेलकर यांचा प्रामाणिकपणा गरीब भाजी विक्रेती वृद्ध महिला साई शेळके हिची रस्त्यात पडलेली 14 हजार रुपयाची रक्कम परत केली.

शंकर दत्ताराम आडेलकर यांचा प्रामाणिकपणा गरीब भाजी विक्रेती वृद्ध महिला साई शेळके हिची रस्त्यात पडलेली 14 हजार रुपयाची रक्कम परत केली.

सावंतवाडी

आंबेगाव येथील साई धाकू शेळके वय वर्ष 60. गेले 40 वर्षापासून सावंतवाडी शहरांमध्ये गावठी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सदर महिलेचे पती वयोरुद्ध आहेत तर तिचा 40 वर्षाचा मुलगा फिट येऊन सतत आजारी पडतो सून गुंगी आहे व तिच्या पदरात दोन मुली आहेत. असा हा सर्व भार या एकट्या महिलेवर पडल्या कारणाने तिला खूप कष्ट घ्यावे लागत आहेत.
कुटुंबातील सदस्यांच आजारपण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती सकाळी 6 वाजता भाजी घेऊन सावंतवाडी गाठते ती संध्याकाळी काळोख पडल्यावर अन्नधान्य घेऊन घरी परतते.
काल दिनांक 23 रोजी कौटुंबिक टेन्शनमध्ये असताना तिची पैशाची पिशवी कुठेतरी पडली अशावेळी समीर पडते हे तिच्याकडे भाजी खरेदी करायला गेले असता ती रडतच पडते यांच्याशी बोलू लागली “बाबा माझे पैसे कुठेतरी पडले मी आता काय करू कदाचित आर्क हाक परमेश्वराने ऐकावी असंच घडलं.
समीर पडते तिला म्हणाले काळजी करू नकोस तुझे पैसे तुला मिळतील असं सांगून तेथून निघून गेला.
काल संध्याकाळी जिल्हा माहिती कार्यालय ओरस येथील शिपाई शंकर दत्ताराम आडेलकर राहणार खासकिलवाडा. यांची भेट पडते यांच्याशी झाली तेव्हा आडेलकर पडतेना सहज म्हणाले काल कुणाची तरी पैशाची पिशवी मला मिळाली.
हे वाक्य ऐकून पडते यांना लगेच आठवलं की कालच एका भाजीविक्रेती वृद्ध महिलेची पिशवी हरवली झाली होती. काल संध्याकाळी त्यांनी त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ती कुठे सापडली नाही.
त्यांनी आज सकाळी लगेचच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली असतात ती आज सकाळी सापडली.
सदर महिलेला आपल्या पैशाच्या पिशवीची ओळख पटली असता तिला सरळ पोलीस स्टेशनमध्ये घेऊन पोलिसांच्या मध्यस्थीने तिची 14 हजार रुपयाची रक्कम असलेली पिशवी तिला सुपूर्त केली हे पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंदाची हास्य पाहून सगळ्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पोलीस कर्मचारी मुकुंद सावंत, पुंडलिक सावंत, तुकाराम जाधव, मयूर सावंत, शंकर आडलकर समीर पडते व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा