You are currently viewing माऊली

माऊली

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माऊली*

 

संतसमागमे मिळते ,आईसम साऊली

‘जगदोध्दारासाठी’ मातेसम काया शिणली

आनंदाने गौरवती संतांना गुरूमाऊली

 

नाती जडती, आई, बहिण,मुलगी,सहचरीची,

आजीच्या रूपे असते खाण अनुभवाची,

अनंत रुपे ,आधारवड ती असे घराची,

दैवी देणगी बु्ध्दी,शक्ती, अन् सदगुणांची.

 

धाडसी,सशक्त,कणखर, कर्मयोगीनी,

नारी व्यक्तिमत्त्व उठुन दिसते खंबीर रुपानी,

वात्सल्य,ममत्व,सोज्वळ, विविध भावांनी,

सौंदर्य खुलते निर्मळ, प्रेमळ रुपानी.

 

तुलना करता प्रपंचातील योगदानाची,

वरचढ होईल अष्टभुजेच्या ‘स्त्रि’शक्तिची,

खंत वाटते पुरुष प्रधान संस्कृतीची ,

पायमल्ली करिती माणुसकीच्या सन्मानाची.

 

संसाराचे योग्य प्रतिक अर्धनारी नटेश्वर ,

‘स्रि ‘शक्तिचा महिमा जाणे तो जगदिश्वर,

‘दुष्ट राक्षस संहाराया’ आदीमायेचाच पुकार,

कसे घडवले स्त्रिला? ते जाणे एकच ईश्वर.

 

 

//*प्रतिभा फणसळकर*//

प्रतिक्रिया व्यक्त करा