*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चिरंजीवी सावली*
*****************
तूच संचिताची पावन सरिता
माझिया श्वासांचीच सावली
जन्मदात्यांची कृपा कृपाळु
तशीच तुझी संगती लाभली
तुझ्याच छायेतला संधिकाल
तृप्तीच कृतार्थी जीवनातली
स्मरती आज गे क्षणक्षण सारे
प्रारब्धाची , रंगपंचमी रंगलेली
तुझिच साथ मज सावरणारी
भावप्रीतीतुनी सदा फुललेली
सांग नां ! सखये गे तूच आता
निर्मली प्रीती गं दुजी कुठली ?
बघ नां क्षितिजाच्या संधेवरती
आजही घुमते मुरलीधरी मुरली
मीही असा अन बघ तुही अशी
आजही डूलतो निर्मोही प्रीतवेली
*************************
*( 13 )*
*©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)*