सिंधुदुर्गाचे सुपूत्र विक्रम नरेंद्र वालावलकर एम.एन.एल.यू विद्यापिठाच्या एल.एल.एम परिक्षेत विद्यापीठात दुसरे !
मालवण
मूळ देवबाग चे असलेले वालावलकर कुटुंबीय म्हणजे विधी क्षेत्रातील मुंबईतील मोठे नाव. मागील चार पिढ्यांपासून वकिली पेशात मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत आदरपूर्वक स्थान कमावलेल्या वालावलकर या ब्रँड चे चौथ्या पिढीचे शिलेदार विक्रम वालावलकर अत्यंत प्रतिथयश अश्या एम.एन.एल.यू विद्यापिठाच्या एल.एल.एम परिक्षेत विद्यापीठात दुसरे आले आहेत! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिघरात आपला वकिली पेशा करणारे विक्रम हे आवी (एडवोकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया) चे सह सचिव म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळतात . त्याच प्रमाणे मुंबईतील बाळासाहेब आपटे विधी महाविद्यालयात विधी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात अधिवक्ता म्हणून सेवा देतात . त्यांच्या या यशाने सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे !