You are currently viewing नागपूरमध्ये रंगणार अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नागपूरमध्ये रंगणार अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नागपूर :

मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेच्या नागपूर विभागा तर्फे आयोजित अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून जवाहर विद्यार्थि गृह हॉल न्यू नंदनवन नागपूर येथे संपन्न होणार आहे. जेष्ठ कवी, साहित्यिक सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष) यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने हे संमेलन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ जय प्रकाश घुमटकर (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ इंजि प्रविण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल) व रत्नाकर मुळीक (जिल्हा उपाध्यक्ष) हे पुढाकार घेऊन दिवसरात्र राबत आहेत व त्याला त्यांच्या संपूर्ण समूहाची उत्तम साथ लाभली आहे. कार्यक्रमाचे स्वरुप – सकाळी 8. ते 9.30 पर्यंत ग्रंथ दिंडी, सभागृहाच्या जवळच्या परिसरातून वाजत गाजत निघेल. सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. ११ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणविस साहेब ऊर्फ लाडके लोकप्रिय व्यक्तीमत्व “देवाभाऊ” हे करणार असून, संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिका डॉ पुष्पा सुभाष तायडे यांना संमेलनाध्यक्ष पदाची जबाबदारी मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ रेखा जगनाळे- मोतेवार सुपुर्द करतील.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. सुधाकर अडबाले जी (शिक्षक आमदार ,महाराष्ट्र राज्य विधान परिषद), मा .श्री मोहन मते (आमदार नागपूर विभाग, महाराष्ट्र राज्य) , मा. श्री कृष्णाजी खोपडे (आमदार, पूर्व नागपूर विधान सभा) हे असणार आहेत.

या कार्यक्रमाचे विशेष आतिथी मा. श्री . मंगेश घवघवे (प्राचार्य नंदनवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय) जेष्ठ साहित्यिक मा.डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ़ कवी गोलघुमट (मुंबई) जेष्ठ कवयत्री मा. ललिता गवांदे (नाशिक), जेष्ठ कवयित्री ना रेखा दिक्षित (कोल्हापूर) हे असणार आहेत.

संमेलनाचे सन्माननिय पाहुणे मा. माजी संमेलनाध्यक्ष डॉ विनायकराव जाधव (पुणे) महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, मा. प्रियंका ठाकूर (हिंदी सिने ,टीवी ,नाट्य अभिनेत्री) श्री कुमार श्रेयस (चित्रपट निर्माते दिग्दर्शक) व मा.रीतू चव्हाण (आध्यात्मिक व रेकी मार्गदर्शक) हे खास पाहुणे कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहेत.

नंतरच्या परिसंवाद सत्रात ‘ वाचन संस्कृति – वास्तव आणि अपेक्षा ‘ या विषयावर मा. बापूराव पाटील ठाकरे (जळगाव जिल्हा अध्यक्ष) हे मुख्य वक्तव्य करणार असून या सत्राच्या अध्यक्षा मा ॲड.नीता कचवे (अमरावती जिल्हा अध्यक्ष) या असणार आहे. या नंतरच्या कवी संमेलन सत्रात संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध नामांकित कवी सहभागी होणार आहे. या सत्रात अध्यक्ष म्हणून जेष्ठ कवयित्री मा. संगीता रामटेके (जिल्हा अध्यक्ष गडचिरोली) असणार असून , प्रमुख पाहुण्या जेष्ठ कवयत्री मा. छाया पाथरे (अमरावती) या असणार आहेत . या कार्यक्रमास परीक्षक संजीवनी काळे (अमरावती) व डॉ ज्योती नागपूरकर (नागपूर) असणार आहेत व जेष्ठ कवी मा. राजेश थळकर (रायगड जिल्हा अध्यक्ष ) हे काव्य स्पर्धा प्रमुख असतील. या संपूर्ण संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ इंजि प्रविण उपलेंचवार ( विदर्भ प्रांतपाल ) व रत्नाकर मुळीकजी ( जिल्हा उपाध्यक्ष ) असून ,श्री सिद्धार्थ कुलकर्णी ( मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष ) त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे सोबत सौ नीता चिकारे ( जिल्हा अध्यक्ष ) ज्योती नागपूरकर ( तालुका अध्यक्ष ) , राजू वाघ ( विदर्भ संघटक ) ,मनीष उपाध्ये ( जिल्हा सचिव ) हे मुख्य आयोजन समिती सदस्य म्हणुन कामात साथ देत आहेत.

संमेलनाचे मुख्य समन्वयक मा. नीलेश घवघवे व सौ. पुनम घवघवे असणार आहेत. संमेलनाचे संयोजन समिती सदस्य श्री नरेंद्र मोहिते ( विदर्भ पूर्व विभाग प्रदेश अध्यक्ष) ,डॉ रमणीक लेंगुरे ( जिल्हा उपाध्यक्ष ) ,डॉ हिरालाल मेश्राम , सागर कोरडे , प्रा उषा राऊत हे असणार आहेत.

संमेलन स्वागतगीत सौ . सुषमा मुलमुले यांनी लिहिले आहे तर प्रसिध्द संगीतकार डॉ.श्री.मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शन केले असून गायिका रसिका बावडेकर यांनी हे स्वागत गीत गायले आहे.

तसेच या संपुर्ण साहित्य संमेलन कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध निवेदक मा. डॉ. रत्नाकर मुळीक (नागपूर) हे करणार आहेत.

तरी सर्वांनी या अभूतपूर्व संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा