You are currently viewing खवणे येथे बस पलटी, चालक-वाहक किरकोळ जखमी…

खवणे येथे बस पलटी, चालक-वाहक किरकोळ जखमी…

खवणे येथे बस पलटी, चालक-वाहक किरकोळ जखमी…

वेंगुर्ले

खवणे येथे रात्री वस्तीला असलेली बस कुडाळच्या दिशेने जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाजा न आल्यामुळे बस घळणीमध्ये पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सकाळी सव्वा सहा वाजता घडली. गाडीतील चालक-वाहक यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खवणे-कुडाळ गाडी वळवण्यासाठी वरच्या मारुती मंदिराकडे नेत असताना केळुस्कर यांच्या घरासमोरील घळणीत पलटी होऊन अपघात झाला . गाडीतील वाहक व चालकाला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे सुदैवाने मोठी आणि टळली आहे. वस्तीच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना हा अपघात झाल्याने गाडीत प्रवासी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला आहे. खवणे गावात एसटीचा एवढा मोठा अपघात पहिल्यांदाच झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा