*श्री गिरोबा देवाचा उत्सव आज
*”सुडाग्नी” २१ ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग होणार सादर
दोडामार्ग
प्रतिवर्षाप्रमाणे नवसाला पावणारा हाकेला धावणारा प्रत्येकाच्या मनातील मनोभावना इच्छा आकांशा पूर्ण करणारा अशी ओळख असलेला श्री. गिरोबा बाबा देवाचा नाटक उत्सव शनिवार दिनांक. २२ फेब्रुवारी रोजी संपन्न होतं आहे.या निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रोळी युवक मंडळ भरपाल यांनी केले आहे.
.
सकाळी १०वाजता सत्यनारायण महापूजा तसेच दुपारी १ ते ३ पर्यंत सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे,सत्यनारायण महापूजा योगेश माणिकराव देसाई यांनी आपल्या नवसपुर्ती निमित्त आयोजित केली आह, संध्याकाळी ४ वाजता भरपाल गावातील स्थानिक भजन कलाकारांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्रो ठीक ११ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर (बाबी कलिंगण) यांचा २१ ट्रिक सीन असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा “मेहंदीपुर चा बालाजी अर्थात सुडाग्नी हा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राष्ट्रोळी युवक मंडळ भरपाल यांनी केले आहे.