You are currently viewing किल्ले सिंधुदुर्गचा उद्या ३५७ वा वर्धापन दिन…

किल्ले सिंधुदुर्गचा उद्या ३५७ वा वर्धापन दिन…

विविध कार्यक्रमांचे आयोजन ; शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन…

मालवण

किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन उद्या ६ एप्रिल रोजी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी ८ वाजता मोरयाचा धोंडा येथे मोरयाचे पूजन होणार आहे. १० वाजता छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिर येथे केला जाणार आहे. मर्दानी खेळांची सलामी न्यू छत्रपती ब्रिगेड कोल्हापूर हे देणार आहेत. ११ वाजता कवी भूषण यांचे शिवरायांवर आधारित काव्य सादर होणार आहे. भूषण साटम हे काव्य सादर करणार आहेत. तरी या कार्यक्रमात मालवणवासीय आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =