You are currently viewing समुद्रकिनारी खडकामध्ये अज्ञात पुरुषाचा आढळला मृतदेह…

समुद्रकिनारी खडकामध्ये अज्ञात पुरुषाचा आढळला मृतदेह…

समुद्रकिनारी खडकामध्ये अज्ञात पुरुषाचा आढळला मृतदेह…

वेंगुर्ले :

रेडी श्री देवी माऊली मंदिर मागे नागोळेवाडी समुद्रकिनारी खडकामध्ये बुधवारी सायंकाळी ५.२० वा. च्या सुमारास एक पुरुष जातीचा (वय सु. ४०) मृतदेह आढळून आला. याबाबत कोणाचेही नातेवाईक मिसिंग असल्यास वेंगुर्ले पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस पाटील श्रावणी भगत यांनी रेडी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप
भोसले, रेडी दूरक्षेत्राचे पीएसआय तुकाराम जाधव, राहुल बर्गे, योगेश राऊळ, दादा परब, योगेश वेंगुर्लेक आदींनी घटनास्थळी जात पंचनाम केला. सदर मृतदेह शिरोडा उपजिल्ह‍ रुग्णालय येथे शवागृहात ठेवण्यात आला आहे. उंची ५.५ फूट, शरीर बांध मजबूत, रंग सावळा असून कुणाचे नातेवाईक मिसिंग असल्यास वेंगुले पोलिस स्थानक, पीएसआय तुकाराम जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेंगुर्ले व शिरोडा पोलिसांच्य वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा