*कसई दोडामार्ग नगरपंचायत मच्छी मार्केट उद्या पासून सेवेत – नगराध्यक्ष चेतन चव्हाण
*दोडामार्ग
कसई दोडामार्ग यांचे नुतन मच्छी मार्केट उद्यापासून लोकसेवेत येतं असून दोडामार्ग वासियांची प्रतीक्षा संपली आहे, आज संध्याकाळी ४ वाजता लॉटरी पद्धतीने गाळे वितरित केले जातील त्यांनतर उद्या या ठिकाणाहून मच्छी व्यवसायिक आपला व्यवसाय सुरु करतील, नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार हातात घेतल्या नंतर अनेक विकासकामे पूर्ण केली, आता या मच्छी मार्केट मुळे आणखी एक विकास काम त्यांच्या नेतृत्वात लोकर्पित केले जातेय, जिल्हा स्तरीय नगारोत्थान निधीतून साधारण ५४ लाख रुपये खर्चून इतर सुविधासह या इमारतीचे काम पूर्ण केले आहे.