You are currently viewing शिवजयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्तींसाठी निवासी आनंद मेळाव्याचे आयोजन

शिवजयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्तींसाठी निवासी आनंद मेळाव्याचे आयोजन

शिवजयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्तींसाठी निवासी आनंद मेळाव्याचे आयोजन

मालवण

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ति बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी निवासी आनंद मेळाव्याचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे करण्यात आले होते.
या दिव्यांग आनंद मेळाव्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,ओरोस,कुडाळ,सावंतवाडी, वेंगुर्ला, व मालवण मधील 29 दिव्यांग व्यक्तींनी सहभाग घेतला होता. संपूर्ण दिवस व रात्री निवासी असलेल्या या आनंद मेळाव्याचा शुभारंभ पूज्य साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.. या प्रार्थनेने सेवांगणाच्या सौ.वैष्णवी आचरेकर व सौ. धनश्री तारी यांनी केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या स्वागतनंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून सर्वांनी शिवरायां प्रति आदरभाव व्यक्त केला.
सेवांगण व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर यांनी. सेवांगणाच्या कार्याची माहिती करून दिली. साईकृपा अपंगशक्तीचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे यांनी आपल्या संस्थेची माहिती करून दिली.साईकृपा संस्थेचे मान्यवर श्री. सुनील तांबे, सदानंद पावले, प्रकाश वाघ, शामसुंदर लोट, अरविंद आलवे, बाबुराव गावडे, राजेंद्र मेस्त्री अन्य उपस्थित होते. यानंतर दिव्यांग आनंद मेळाव्यात सहभागी अन्य व्यक्तींनी आपल्या अंगभूत कलागुण सादर केले. त्यात अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची बॉल पॅसिंग यासारखे खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या.अंतक्षरी खेळानंतर सकाळचे सत्र पूर्ण करून जेवणाचा आनंद घेण्यात आला. दुपारच्या सत्रात संगीत खुर्ची बॉल पॅसिंग हे खेळ घेण्यात आले. सायंकाळी या स्पर्धांमधील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.त्या नंतर बीच वर बॉल पॅसिंग व समुद्र किनारी गप्पागोष्टीचा आनंद लुटला. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी प्रार्थना व आभार व्यक्त करत सर्वांनी सकाळचा चहा नाश्तानंतर एक दुसऱ्याचा निरोप घेत आपापल्या घरी प्रस्थान केले.
सेवांगणाचे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर सर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शिलेश खंडाळेकर, कार्याध्यक्ष श्री. पद्मनाभ शिरोडकर, यांनी आनंद मेळाव्यातील सर्व सभागीना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ति बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल चे अध्यक्ष शिंगाडे सर यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा