सिंधुदुर्गनगरी
सन 2020-21 या वर्षीचे महाडीबीटी प्रणालीवर अनु.जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गाचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करण्याची प्रक्रिया सामाजित न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या mahadbtmahait या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यार्थी व पालक यांनी नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण त्वरीत करावे असे आवाहन जयंत चाचरकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.