You are currently viewing देवगड येथे आयोजित श्रीराम गीत गायन स्पर्धेला प्रतिसाद; चव्हाण, ठाकुर, देसाई ठरले विजेते….

देवगड येथे आयोजित श्रीराम गीत गायन स्पर्धेला प्रतिसाद; चव्हाण, ठाकुर, देसाई ठरले विजेते….

देवगड येथे आयोजित श्रीराम गीत गायन स्पर्धेला प्रतिसाद; चव्हाण, ठाकुर, देसाई ठरले विजेते….

देवगड

अयोध्या सोहळ्याचे औचित्य साधून देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम गीत गायन स्पर्धेत बाल गटात वेद चव्हाण, कुमार गटातून प्राजक्ता ठाकूर तर खुल्या गटातून शौरीन देसाई यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. कै. श्रीमती नीता निळकंठ दीक्षित स्मृतिप्रीत्यर्थ, श्री निरंजन निळकंठ दीक्षित पुरस्कृत श्रीराम गीत गायन स्पर्धा श्री दत्त मंगल कार्यालय येथे दिमाखात पार पडली. यात बालगट, कुमार गट व खुला गट मिळून सुमारे ७० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेची सुरुवात विनायक नेने व निरंजन दीक्षित यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

याप्रसंगी प्रियांका वेलणकर यांनी गुरु गीत सादर केले. उदय गोखले व विनोद गोखले यांनी परीक्षण केले. स्पर्धा आयोजन समितीमध्ये प्रियांका वेलणकर, हर्षद जोशी, विश्वास वेलणकर, संदीप फडके, मानसी करंदीकर, राधिका काणे आणि ओंकार गाडगीळ यांनी स्पर्धा आयोजनाचे काम पाहिले. संदीप फडके, प्रियांका वेलणकर व हर्षद जोशी यांनी हार्मोनियम तर सौरभ वेलणकर व अभिनव जोशी यांनी तबला साथ केली. स्पर्धेचे सूत्रसंचालन ओंकार गाडगीळ यांनी केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही केवळ गीत गायन स्पर्धाच न राहता, गीतांद्वारे प्रभू श्रीरामांना दिलेली एक आगळीवेगळी मानवंदना ठरली.

स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी बुजुर्ग कीर्तनकार मधुकर गोगटे, भजनी बुवा सखाराम पुजारे, पखवाज वादक प्रवीण पुजारे, गायक प्रसाद शेवडे, गायिका राधा जोशी, सच्चा राम भक्त दामूकाका अभ्यंकर आणि चित्रकार अभिषेक मेस्त्री यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर यश वेलणकर यांनी आपल्या खास शैलीमध्ये रामाचा आदर्श जीवनात कसा ठेवावा याबाबत मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण समारंभ सर्व सत्कारमूर्ती तसेच विनायक नेने आणि दीक्षित फाउंडेशनचे सर्वेसर्वा निरंजन दीक्षित यांच्या शुभहस्ते पार पडला.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:

बालगट- प्रथम क्रमांक – वेद चव्हाण, द्वितीय क्रमांक- आरोह पेंडुरकर, तृतीय क्रमांक- हिमांशू चव्हाण, उत्तेजनार्थ- शौनक वेलणकर

 

कुमार गट- प्रथम क्रमांक- प्राजक्ता ठाकूरदेसाई, द्वितीय क्रमांक- संस्कृती जोशी, तृतीय क्रमांक- हर्ष बोंडाळे,उत्तेजनार्थ- राज्ञी कुलकर्णी.

 

खुला गट- प्रथम क्रमांक- शौरीन देसाई, द्वितीय क्रमांक- निशा धुरी, तृतीय क्रमांक- हेमंत तेली.

उत्तेजनार्थ- श्रेया देवधर.

सदर स्पर्धेमध्ये सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम असे बक्षिसाची स्वरुप होते. दीक्षित फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे सांगीतिक क्षेत्रामध्ये एक चांगला नवीन पायंडा पडला असे म्हणता येईल. स्पर्धक प्रेक्षक व संगीत जाणकारांकडून स्पर्धेच्या यशस्वितेबाबत उत्तम अभिप्राय येत आहेत. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा