You are currently viewing जागरुक नागरिक सेवा संघ व पंचशिल ट्रस्ट ओरोस, तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

जागरुक नागरिक सेवा संघ व पंचशिल ट्रस्ट ओरोस, तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

जागरुक नागरिक सेवा संघ व पंचशिल ट्रस्ट ओरोस, तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

ओरोस

जागरुक नागरिक सेवा संघ व पंचशिल ट्रस्ट ओरोस, (जैतापकरकॉलनी) जागरुक नागरिक सेवा संघच्या कार्यालयामध्ये दिनांक 19.02.2025 रोजी शिवजयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली. मा.अध्यक्ष, श्री.अरविंद भगवान सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री.संजय खोटलेकर, अध्यक्ष, पंचशिल ट्रस्ट,ओरासे, श्री.शंकर भोगले, सचिव, जागरुक नागरिक सेवा संघ तसेच श्री.शिवा पाताडे, श्री.सुधीर मालवणकर, श्रीम.प्राची चव्हाण, श्रीम.नक्षत्रा गेंड सदस्य हे यावेळी उपस्थित होते.
सदरवेळी या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आताच्या पिढीने आपला जीवनक्रम करावा व आपले नाव त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे अशा अशायाचे विचार श्री.संजय खोटलेकर यांनी मांडले. त्यानंतर शिवाजी महाराज नसले असते तर आम्हा हिंदू धर्म अस्वित्वात राहिला नसता म्हणून शिवाजी महाराज यांना पुज्यनीय मानून व त्यांचा इतिहास वाचणे खुप गरजेचे आहे. अशा आशयाचे विचार जागरुक नागरिक सेवा संघाचे सचिव मा.श्री.शंकर भोगले यांनी मांडले. त्यानंतर अध्यक्ष, श्री.अरविंद सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
छायाचित्रात-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना उपस्थित मान्यवर.

प्रतिक्रिया व्यक्त करा