महाडिबिटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
शैक्षणिक वर्ष 2024-2025 करीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने योजना, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना इ. योजनेस नवीन अर्ज नोंदणी करणे व नुतनीकरण करणसाठी अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी ऑनलाईन पध्दतीने महाडिबिटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाडिबिटी प्रणालीवरील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडिबिटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. समाज कल्याण विभागामार्फत दि. 25 जुलै 2025 पासून महाडिबिटी पोर्टल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
विद्यार्थींनी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी, जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरण्यासंदर्भात कार्यशाळा घेवून परिपत्रक, शाळा, महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात लावणे तसेच पॅलेक्स होर्डिग्ज महाविद्यालयाच्या आवारात लावण्याचे सूचना दिल्या आलेत.
विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 28 फेब्रुवारी 2025 अखेर भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित सर्व महाविद्यालयाची राहिल. अनु जाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज वेळेवर नोंदणी करुन घेण्याबाबत व महाविद्यालय स्तरावर अर्जांची छाननी करुन प्रस्ताव मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सिंधुदुर्ग कार्यालयाकडे वेळेवर पाठविण्यातबाबत महाविद्यालयांना सूचित करुन आवाहन करण्यात येत आहे. या योजनेपासून मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहिल्यास यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य व महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहतील असे प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे.
०००००
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी 18 (जि.मा.का) :- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेश शिष्यवृत्तीसाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने 25 फेब्रुवारी अखेर अर्ज मागविण्यात येत आहे. या परदेश शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालय,3 चर्च, रोड पुणे यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करीता अल्पसंख्याक समुदायातिल विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष “समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-४११००१” येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर तसेच योजनेचे निकषांची माहितीसाठी www.maharashtra.gov.in (जलद दुबे ताज्या घडामोडी) येथे या संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.०२३६२-२२८८८२ येथे संपर्क साधावा.