You are currently viewing भोसले नॉलेज सिटी येथे ‘शिवजयंती ‘ उत्साहात…..

भोसले नॉलेज सिटी येथे ‘शिवजयंती ‘ उत्साहात…..

_*भोसले नॉलेज सिटी येथे ‘शिवजयंती ‘ उत्साहात…..*_

_*पोवाडे, नामघोष व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यमय…..*_

_भोसले नॉलेज सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सर्व प्राचार्य, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते._

_विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्य करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. भोसले इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थिनींनी पोवाडे व भाषण करत महाराजांना मानवंदना दिली. वायबीआयएस प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी गोंधळी नृत्यही सादर करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता._

प्रतिक्रिया व्यक्त करा