*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी*
*भाजपा तालुका कार्यालयात शिवप्रतिमेस व माणिकचौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन !!!*
वेंगुर्ले
“हे रयतेचे राज्य आहे. रयतेचे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा” असे म्हणणारा हा जगाच्या पाठीवर झालेला एकमेव राजा. त्याला येथील माणसांनीच नाही तर डोंगर , द-याखो-यांनी, झाडा झुडपांनी साथ दिली. या सर्वांच्या साथीने आणि साक्षीने शिवाजी राजांनी रयतेचं राष्ट्र निर्माण केले. धन्य तो राजा, जो रयतेचे राज्य उभारण्यासाठी आयुष्यभर झटला. अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवाद , असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले .
वेंगुर्ले भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . तसेच वेंगुर्ले शहरातील माणिकचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ वृंदा गवंडळकर , मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर , सौ श्रेया मयेकर महिला शहर अध्यक्षा , सौ आकांशा परब महीला मोर्चा ता. सरचिटणीस, सौ रसिका मठकर(शहर सरचिटणीस), अल्प संख्यांक मोर्चा चे सौ हसीनबेगम मकानदार, श्री शरद मेस्त्री (ओबीसी मोर्चा) व रमेश नार्वेकर , युवा मोर्चा चे मनोहर तांडेल, श्री दशरथ गडेकर , माणिकचौक मित्रमंडळाचे रोहीत वेंगुर्लेकर व नितीश कुडतरकर , विनय गोगटे , नरहरी खानोलकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.