शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आज कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय पडते यांनी घोषणा केली. सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता काम करणे अशक्य असल्याने राजीनामा देत असल्याचे संजय पडते यांनी सांगितलं. आपली पुढील भूमिका आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय पडते यांनी आज कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी ठाकरे शिवसेना उपविभाग प्रमुख सचिन गावडे, काशीराम घाडी, विकास घाडी, किशोर तांबे, भास्कर गावडे, गुरुनाथ गावडे, गुरुनाथ चव्हाण, गणपत चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.