*ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा संजय पडते यांचा राजीनामा*
लवकरच पुढील निर्णय घेणार.
कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिली माहीती
कुडाळ
मी श्री. संजय धोंडदेव पडते, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 1985 सालापासून बाळसाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. आपल्याच नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद ! सद्यस्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल अशी परिस्थिती नाही.
आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम कले. सध्या पक्षांतर्गत सुरु असलेल्या घडामोंडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा देत आहे.मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून राहीन.