कसाल पुल येथे होणार भव्यदिव्य शिवजयंती उत्सव*
*कुडाळ
ओसरगावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच एकनिष्ठ मावळे एकत्र येऊन भव्य दिव्य भारदस्त जबरदस्त शिवजयंती कार्यक्रम कसाल पुल येथे करण्यात येणार आहे त्या नियोजनाची रूपरेषा ठरवण्याची बैठक नुकतीच सर्व ग्रामस्थांच्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडली.
गेली कित्येक वर्ष गावातील शिवभक्तांच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम उत्सव पार पडत होता त्याचाच एक भाग म्हणून सर्व गावातील तरुण शिवभक्त एकत्र येऊन मोठ्या स्वरूपात कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले.