महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना सहाय्य अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अवाहन
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला उपचार, पुनर्वसन केंद्र, प्रचार व प्रसार योजनेअंतर्गत स्वयसेवी संस्थाचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन प्रत्येक महसूल विभागामधून दोन संस्थाना प्रत्येकी रुपये 11 लाख याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमूल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी दिली आहे.
या योजनेसाठी प्राप्त प्रस्तावांमधून गुणवत्तेच्या निकषाप्रमाणे शासन स्तरावरील निवड समितीकडून संस्थांची, केंद्राची निवड करण्यात येते. यासाठी नियमावली विहित नमुन्यातील आर्ज याबाबतची माहिती https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, सदरचे प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत दिनाक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायकाळी 5.00 वाजेपर्यंत असून सदरचे प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावेत विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दुरध्वनी क्र. 022-22025251,220208660 वर संपर्क साधावा.
व्यसनमुक्ती सल्ला उपचार पुनर्वसन केंद्र प्रचार व प्रसार कार्यात सहभाग असलेल्या स्वयंसेवी संस्था, केंद्रे यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस व समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले आहे.