राज्य वकील क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अनिल निरवडेकर…
सावंतवाडी
महाराष्ट्र वकील क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सावंतवाडीचे सुपुत्र आणि नामांकित वकील अनिल निरवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. श्री. निरवडेकर यांनी असोसिएशनच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या राज्यभरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य दाखवले होते. जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी वकील व न्यायाधीश वर्ग यांच्यात गेली २५ वर्षे जानेवारी क्रिकेट स्पर्धा भरण्यात येतात. यामध्ये त्यांनी बरीच पारितोषिक मिळविली होती. या सर्व कामाचा लेखाजोखा लक्षात घेता श्री. निरवडेकर यांना या पदावर संधी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र व गोवा राज्य बार असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम देसाई यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
दरम्यान आपल्यावर टाकलेला विश्वास हा नक्कीच आपण सार्थकी लावणार आहे. तसेच क्रिकेटला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.