You are currently viewing गणित प्राविण्य परीक्षेत बांदा केंद्र शाळेची दुर्वा नाटेकर जिल्ह्यात प्रथम

गणित प्राविण्य परीक्षेत बांदा केंद्र शाळेची दुर्वा नाटेकर जिल्ह्यात प्रथम

*गणित प्राविण्य परीक्षेत बांदा केंद्र शाळेची दुर्वा नाटेकर जिल्ह्यात प्रथम*

बांदा

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित इयत्ता पाचवीच्या गणित प्राविण्य परीक्षेत पीएम श्री बांदा नं.१ केंद्र शाळेतील विद्यार्थीनी दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
सिंधुदुर्ग गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीने दरवर्षी गणित संबोध परीक्षा घेऊन पुढे गणित प्राविण्य परीक्षा घेण्यात येते व त्यातून राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या प्राविण्य परीक्षेत बांदा केंद्र शाळेतून दुर्वा नाटेकर बरोबरच,स्वरा बांदेकर, तन्वी साईल, स्वामिनी तर्पे व अंकिता झोळ या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ,उपशिक्षक जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, स्नेहा घाडी,जागृती धुरी,मनिषा मोरे,कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील प्रज्ञा परीक्षेला शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा