*कणकवली शहरात उबाठा सेनेला मंत्री नितेश राणे यांनी पाडले मोठे खिंडार*
*प्रद्युम मुंज यांच्यासहित उबाठा चे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकाराने कणकवली शहरात मोठे पक्षप्रवेश सुरू
कणकवली ;
कणकवली शहरात उद्धव ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले असून कणकवली शहरातील महापुरुष मित्र मंडळाचे व ठाकरे पक्षाचे क्रियाशील कार्यकर्त्यांनी आज मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे पक्षाला कणकवली शहरात हा मोठा धक्का मानला जात आहे.
आज नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये ओम गणेश निवासस्थानी भाजपावासी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रद्युम मुंज,वृषभ मेणकुदळे, रोशन मांगले, सुरज ओरसकर, रुद्र सापळे, हर्षल बिडये, जयेश मुंज,आशिष मुंज,तुषार मेणकुदळे,जयेश बिडये,निखिल लोकरे,मंदार पोटफोडे,विनायक तेली,सागर जावडेकर, जयेश जावडेकर,संदीप केतकर,भगीरथ प्रजापती,दिनेश सोलंकी, आकाश बिडये, अक्षय डिचोलकर, अमोल डिचोलकर, प्रथमेश सोलकर, आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,शहराध्यक्ष अण्णा कोदे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्धम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.