You are currently viewing एम.आय.टी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

एम.आय.टी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

ओरोस :

कॉलेज जीवन संपल्यावर प्रत्येकाला रियल लाईफला सामोरे जावे लागते ते चॅलेंज स्वीकारून आपण कशा प्रकारे पुढे जातो हे महत्त्वाचे असून यावर आपले भविष्य अवलंबून आहे. आयुष्यात चांगले प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल. जिल्ह्यात एम.आय.टी.एम. चे नाव सर्वांत अग्रेसर होईल आणि याची ख्याती कायम टिकून राहील असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले. जयवंती बापू फाउंडेशन संचलित सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जल्लोषात उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, कॉलेज जीवनातील माझ्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जीवनातील रियल चॅलेंज महत्त्वाचे आहे. कॉलेज जीवन संपल्यावर प्रत्येकाला रियल लाईफला सामोरे जावे लागते ते चॅलेंज स्वीकारून आपण कशा प्रकारे पुढे जातो हे महत्त्वाचे असून यावर आपले भविष्य अवलंबून आहे. आयुष्यात चांगले प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल. जिल्ह्यात एम.आय.टी.एम. चे नाव सर्वांत अग्रेसर होईल आणि याची ख्याती कायम टिकून राहील असे प्रतिपादन करत एम. आय. टी. एम. कॉलेजला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यालयांना प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या काही मुख्याध्यापकांचे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला याप्रसंगी बोलताना शिवाजी विद्यालय हिर्लोकचे मुख्याध्यापक दिनेश महाडगुत म्हणाले की, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे कॉलेज म्हणजे एम. आय.टी.एम. कॉलेज, येथे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी नक्कीच फायदा होईल आणि आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी नवकी इंजीनियरिंग मार्फत उच्च पदावर विराजमान होतील, कसाल न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उत्तम मळगावकर देखील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, विद्यार्थ्यांचे करिअर घडवून देण्याचे काम उत्तमरीत्या एम.आय.टी.एम. कॉलेज करत आहे.

फक्त विद्यार्थ्यांनी आपला उद्देश व ध्येय साध्य करणे आवश्यक आहे, तर पाट हायस्कूल आणि जुनियर कॉलेजच्चे मुख्याध्यापक राजन हंजनकर या कार्यक्रमास उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, मी एक क्रीडा शिक्षक म्हणून फिजिकल टीचर्स असल्याने जबाबदारी स्वीकारणे हे जसे शिक्षकाचे काम आहे, त्याचप्रमाणे तुम्ही देखील आपल्या आयुष्यातील जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडावी असे विद्याच्यर्थ्यांना सांगितले, संस्थेचे विश्वस्त विनोद कदम या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि आपल्या कॉलेज विषयी बोलताना ते म्हणाले की, हे दुर्गम भागातील अभियांत्रिकी कॉलेजेस असून देखील गेली १४ वर्षे आपले नाव अनेक जिल्ह्यात नावाजलेले आहे.

महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त विद्यार्थी आज आपल्याकडे शिकत आहेत आणि शिकून उच्च पदावर गेली आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात आदर केल्यास व्यवस्थित रित्या यश संपादन करु शकता, तुम्ही उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत रहा. आम्ही तुमच्यासाठी पुढील भविष्यात निर्माण होणा या स्पर्धा परीक्षांकरिता प्रयत्न करू आणि आपल्या विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. भविष्यातील होणाऱ्या सुवर्णसंधीचा तुम्ही फायदा करून घ्यावा, तसेच त्यांनी श्री सद्गुरु वामनराव पे यांच्या विचारांचा संदेश विद्यार्थ्यांना देताना म्हणाले की, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विचारांमार्फत त्यांनी समाजाचे आपण ऋणी आहोत समाजाचे ऋण फेडण्याचे कर्तव्य आपले आहे तर यशस्वी आणि उज्वल भविष्य घडू शकेल असे त्यांनी सांगितले.

या उ‌द्घाटनाप्रसंगी संस्थेच्या खजिनदार सौ. वृषाली कदम, डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्हि. रुणाल, डिप्लोमा प्राचार्यश्री, विशाल कुशे, उपप्राचार्य सी. पूनम कदम उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, सेक्रेटरी सौ. नेहा पाल तसेच विश्वस्त केरान कदम यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा