You are currently viewing कोमसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन २२ मार्चला सावंतवाडीत…

कोमसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन २२ मार्चला सावंतवाडीत…

कोमसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन २२ मार्चला सावंतवाडीत…

सावंतवाडी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन २२ मार्चला सावंतवाडी येथे घेण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. शाखेची मासिक बैठक नुकतीच येथील पर्णकुटी विश्रामगृह सावंतवाडी येथे पार पडली.

यावेळी सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच २७ फेब्रुवारीला “मराठी भाषा दिन” कार्यक्रम साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान श्री. मस्के यांनी ३६ वर्ष जिल्हा बँकेत सेवा बजावल्यानंतर नुकतेच ते सेवानिवृत्ती झाले. या निमित्ताने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे शुभेच्छा दिल्या.

यावेळी आनंद वैद्य, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, उषा परब, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अरूण पणदुरकर, भरत गावडे, नकुल पार्सेकर, प्रा.प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, मंगल नाईक-जोशी, रामदास पारकर, विनायक गांवस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा