बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीचे दोघे ताब्यात
आरोसबाग पूलावर इन्सुली एक्साइजची कारवाई
बांदा
तेरेखोल नदीवरील आरोसबाग पूलावर गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने आज पहाटे कारवाई केली. या कारवाईत १,१४,२४० रुपयांची दारू व ३ लाख रुपयांची कार असा एकूण ४ लाख १४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी गणेश लक्ष्मण चव्हाण (३५) व सीसील जॉन फेराव (५५, दोघेही रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. मारुती इको कार (एमएच ०७ क्यू ३३१७) मध्ये विविध ब्रँडचे २४ बॉक्स (११०४ बाटल्या) जप्त करण्यात आल्याt.
सदर कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.