You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने

*आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने*

मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.बांदिवडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार फंड, बजेट व खासदार फंडाच्या माध्यमातून सुमारे १ कोटीचा विकास निधी देण्यात आला आहे. खा. विनायक राऊत यांनी आपल्या खासदार फंडातून मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी ते भगवंतगड जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १० लाख रु. मंजूर केले आहेत.त्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत आ. वैभव नाईक यांचा सत्कार केला.

यावेळी कुडाळ विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, मसुरे सरपंच संदीप हडकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, पप्पू परुळेकर,आयवान फर्नांडिस बांदिवडे ग्रा. प.सदस्य स्वप्नील मुणगेकर, ग्रा. प.सदस्य पुष्पक घाडीगावकर, ग्रा. प.सदस्य नारायण परब, ग्रा. प.सदस्य श्रुती गावकर, सुभाष मुणगेकर, बबन चौकेकर, प्रफुल्ल हडकर, बबलू मिठबावकर, योगेश मेस्त्री, कालिदास मुणगेकर, विकास आचरेकर,विनायक गावकर, अभिषेक मयेकर, समर्थ मिठबावकर, नरेश मसुरकर आदींसह बांदिवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − fourteen =