*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी ज्ञानेश्वर चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांजसय*
सांज होई घरा परतती पाखरे
गाय गोठ्यातूनी हंबरती वासरे
रंग मावळतीचा शेंदरी केसरी
कोण कोरतो नभांगणी अक्षरे
पांदणीत जाई धूळ दूर अंबरी
सांजदीवे लावी मंदीरी लेकरे
सूर छेडीतो बासरीचे कुणी
घंटानाद ऐकूनी ऊंडरती वासरे
लावून सांजवात वाट पाही ओसरी
धनी येता घरी अंधार ओसरे
वाट पाही माय तुळस बिंद्रावनी
तृप्त झाली पाहूनी घरट्यात पाखरे
ज्ञानेश्वर चौधरी