*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असशी तू मम ह्रदयी*
असशी तू मम ह्रदयी,जाणते मी जरी
तुला शोधण्या का फिरते मी दारौदारी तरी॥धृ॥
तू कर्ता अन तूच करविता
निर्माता तू तू लयकर्ता
तुझ्या कृपेने दिवस आजचा,भोगते मी जरी
तुला शोधण्या का फिरते मी दारोदारी तरी॥१॥
भासतोस मज सप्तसुरांतून
विशाल सरितेच्या पात्रातून
गंधित सुमनांतुनही जरी
तुला शोधण्या का फिरते मी दारोदारी तरी॥२॥
लोचन मिटुनी जेव्हा बसते
मूर्त रूप सामोरी दिसते
अंतरातल्या तुलाच ईशा,पाहते मी जरी
तुला शोधंण्या का फिरते मी दारोदारी तरी॥३॥
देहमंदीरी तुझीच मूर्ती
करी मम कामनांची पूर्ती
विश्वासाने उपासना मी तुझी रे करिते जरी
तुला शोधण्पा का फिरते मी दारोदारी तरी॥४॥
*अरुणा मुल्हेरकर*
*ठाणे*