मालवण :
स. का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेत असलेली तसेच टी. वाय. बी ए या वर्गात शिक्षण घेत असणारी, एनसीसी अंडर ऑफिसर हर्षदा पवार हिची दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आज पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला खेळाडू दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. आतापर्यंत कोणीही नेमबाजी स्पर्धेत अर्थात रायफल फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये एनसीसी कडून दिल्ली पर्यंत पोहोचलेली महिला खेळाडू नव्हती मात्र पहिल्यांदाच एनसीसी विभागातून महिला खेळाडू म्हणून अशा प्रकारची निवड झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3500 विद्यार्थी एनसीसी मध्ये एनसीसी कॅडेट प्रवेश घेतलेले आहेत. तसेच महाराष्ट्रात तीन लाख एनसीसी विद्यार्थी आहेत आणि देशभरात 15 लाख एनसीसी विद्यार्थी आहेत. हर्षदा पवार ही आर्मी कडून फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालेले आहे. 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग एनसीसी विभागाकडून ती सध्या खेळत आहे. गेली दोन वर्ष ती सतत आर्मी ऑफिसर कर्नल दीपक दयाल लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर खोत तसेच बटालियनचे सर्व आर्मी ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालेली आहे. आतापर्यंत तिने दहा-दहा दिवसाचे 11 कॅम्प केलेले आहेत त्याचबरोबर एक एक महिन्याचे दोन कॅम्प केलेले आहेत. त्या प्रत्येक कॅम्पमध्ये ती विजयी झालेले आहे. आणि आत्ता 9 फेब्रुवारीपासून ते 09 मार्चपर्यंत दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत आर्मी एनसीसी कडून तिची निवड झालेली आहे. आतापर्यंत तिने कोल्हापूर, पुणे, मुंबई, तामिळनाडू, केरळ, भोपाळ अशा अनेक ठिकाणी आणि राज्यातून विविध फायरिंग कॅम्पमध्ये विजयी होऊन पुढील फेरीसाठी सिलेक्ट होत गेलेली आहे. भारतामध्ये एनसीसी अंतर्गत असणारे विद्यार्थ्यांची संख्या 150 लाखापेक्षा अधिक आहे आणि त्या 15 लाखांमधून अशा प्रकारची निवड होणं ही महाराष्ट्रासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, मालवण तालुक्यासाठी तसेच कृ सी देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स का पाटील कॉलेज मालवण एनसीसी विभाग आणि 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या सर्वांसाठी एक अभिमानास्पद बाब आहे.
बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल , तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम आणि अलीकडेच जॉईन झालेले ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक साहेब व इतर आर्मी ऑफिसर यांनी गेली दोन वर्ष सतत तुझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतलेली आहे प्रॅक्टिस साठी लागणारा सर्व खर्च आर्मी मार्फत करण्यात आलेला आहे गेल्या दोन वर्षांमध्ये जो काही खर्च झालेला आहे किंवा आजपर्यंत दिल्लीला जाण्यापर्यंतचा सर्व खर्च आर्मी मार्फत करण्यात येत आहे. लेफ्टनंट प्राध्यापक एमआर खोत सिंधुदुर्ग कॉलेज यांचे तिला मार्गदर्शन लाभले. दिल्लीसाठी सिलेक्शन होणे म्हणजे अत्यंत कठीण बाब आहे आणि ते सर्व अडथळे पार करून तीन दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही मजल मारलेली आहे आणि ही एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कौतुकस्पद बाब आहे. असे कर्नल दीपक दयाल (उत्तर प्रदेश) यांनी व्यक्त केले. सिंदूर कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत, यांनी तिला गेली तीन वर्ष मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आज राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारलेली आहे . लेफ्टनंट प्राध्यापक मल्लेश खोत आणि सिंधुदुर्ग कॉलेज प्राचार्य डॉ .शिवराम ठाकूर यांनी अभिनंदन आणि कौतुक केले. त्याचबरोबर कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर साहेब कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर,, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुषे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण कृ. सी देसाई शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ यामध्ये संदेश कोयंडे, प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी हर्षदाची अभिनंदन केले. तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक, ऑफिस स्टाफ लायब्ररी स्टाफ मालवण मधील इतर पदाधिकारी, कॉलेजचे एनसीसी सीनियर, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, मालवण तालुका पोलीस प्रमुख कोल्हे साहेब, मालवण तहसीलदार वर्षा झालते मॅडम यांनी हर्षदाचे अभिनंदन केले. आणि मालवण साठी हे एक कौतुकास्पद बाब आहे असा उल्लेख केला. 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम लेफ्टनंट कर्नल मंडलिक यांनी हर्षदा चे कौतुक केले. कॉलेजमधील इतिहासातील ही एक ऐतिहासिक घटना आहे जी कायमस्वरूपी कॉलेजच्या, मालवण तालुक्याच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद राहील अशा प्रकारचे उदगार कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल उत्तर प्रदेश यांनी काढले. एनसीसी कॉलेज जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एनसीसी मुळे आपल्याला एक शिस्त निर्माण होते, एनसीसी मुळे आर्मी, नेव्ही एअर फोर्स मध्ये नोकरीच्या संधी आहेत. रिलायन्स व इतर अनेक खाजगी उद्योगांमध्ये सुद्धा एनसीसी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. तटरक्षक दल, पोलीस, बॉर्डर पोलीस फोर्स, अशा अनेक ठिकाणी NCC विद्यार्थ्यांसाठी संधी आहेत. एनसीसी हा कोर्स आर्ट्स कॉमर्स सायन्स तसेच इतर कोणताही कोर्स करत असताना कॉलेज करत असताना कोणत्याही विद्यार्थ्याला करता येतो आठवड्यातून फक्त काही तास वेळ द्यावा लागतो. एनसीसीमुळे आपले करिअर घडू शकते. एकंदरीत एनसीसीमध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत. त्यासाठी मालवण तालुक्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज शिक्षण घेत असताना एनसीसी मध्ये प्रवेश घ्यावा आणि आपला स्वतःचा विकास, समाजाचा विकास आणि देशाचा विकास आणि देश सेवेला हातभार लावावा अशा प्रकारचे वक्तव्य लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. मल्लेश खोत यांनी केले.