कलंबिस्त येथे १६ रोजी रक्तदान शिबीर
सावंतवाडी
स्वराज्यरक्षक युवक मंडळ,कलंबिस्त-गणशेळवाडी व ऑन कॉल रक्तदाते संस्था,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जास्तीत-जास्त दात्यांनी रक्तदान करावे. अधिक माहितीसाठी रवींद्र तावडे (९४२१३७१४८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वराज्य रक्षक युवक मंडळ, कलंबिस्त-गणशेळवाडी व ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.