सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटक्या जमाती मधील सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्यकरणाऱ्या सामाजिक कार्यर्त्याचा गौरव करवा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबडेकर समाजभूषण पुरस्कार (व्यक्ती), साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार (संस्था) नमुद पुरसकारासाठी व्यक्ती व संस्था यांना प्रदान करण्यात येतो.
या पुरस्कारासाठी जिल्ह्यामधील इच्छुक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थानी पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत 3 प्रतित सर्व कागदपत्रासह सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.