You are currently viewing एवढे सांगून दे तू

एवढे सांगून दे तू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*❤️❤️एवढे सांगून दे तू ❤️❤️*

 

 

बेरजेची अक्षरे का मोजली सांगून दे तू ।

मी तुझा का तूच माझी एवढे सांगून दे तू ।।

 

झुंबरांचा मंद दीप अंबरातील चांदण्या ।

काय आवडते तुला एवढे सांगून दे तू ।।

 

गंधल्या हृदयातल्या अत्तरातील भाव घे ।

तृप्तता येईल का गं एवढे सांगून दे तू ।।

 

त्या नभातील चंद्रमा वा वारिधि मुक्ताफले ।

का दवांनी स्पर्श केल्या पुष्करा सांगून दे तू ।।

 

या ऋतुंचे सोहळे वा अंबरी रंगावली त्या ।

त्या धृवांची आस आहे एवढे सांगून दे तू ।।

 

चांचल्य तू वार्‍यातले अन् मी सुखांची गम्यता ।

का हवे सर्वस्व माझे एवढे सांगून दे तू ।।

 

मी दिले सर्वस्व आणि जर रिकामा जाहलो ।

तो तुझा आनंद का गं एवढे सांगून दे तू ।।

 

*©सर्वस्पर्शी*

©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

नाशिक ९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा