You are currently viewing “शिव उद्योग संघटनेचा ग्रामीण रोजगार व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम – सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांचा महत्त्वपूर्ण सहभाग अपेक्षित”

“शिव उद्योग संघटनेचा ग्रामीण रोजगार व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम – सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांचा महत्त्वपूर्ण सहभाग अपेक्षित”

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांना आपल्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरापासून संघटना ग्रामीण तरुणांना रोजगार आणि महिला सक्षमीकरणावर कार्य करत आहे. यामध्ये महिलांना स्व-निर्मित व्यवसायांमध्ये संधी देणे, तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करणे, तसेच महिला व ग्रामीण तरुणांच्या उत्पादनांसाठी विपणन (मार्केटिंग) आणि विक्रीच्या सुविधा उपलब्ध करणे ह्या गोष्टींचा समावेश आहे.

काळीद यांनी सांगितले की, “ह्या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत, परंतु त्यासाठी आपला सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आम्ही महाराष्ट्रातील सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांना आमच्या या महत्त्वपूर्ण कार्यात सामील होण्यासाठी आवाहन करत आहोत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “वास्तू लक्ष्मी प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना सामाजिक प्रतिष्ठा व आत्मनिर्भरतेचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळणार आहे, आणि अशा उपक्रमांना अधिकाधिक सहभाग मिळाल्यास आर्थिक सक्षमतेची दिशा निश्चित होईल.”

संघटनेचा मुख्य उद्देश ग्रामीण समाजाचा विकास आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे. त्यांनी या उपक्रमात वृत्तपत्र आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने यश प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी दीपक विठ्ठल काळीद – 982031715 आणि

प्रकाश ओहळे – 9702058930

यांना संपर्क साधू शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा