You are currently viewing उबाठा पक्षाचे देवगड नगरपंचायतचे नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश

उबाठा पक्षाचे देवगड नगरपंचायतचे नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश

*प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्ष प्रवेश*

ओरोस :

आज उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका मिळाला आहे. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, वार्ड क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. त्यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नामदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये हा पक्ष प्रवेश केला. त्यामुळे देवगड नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचे या पक्षप्रवेशाने फार मोठी ताकद वाढली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फार मोठे खिंडार पडले आहे.

यावेळी नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचे समवेत वीरेंद्र कुमठेकर, सुबोध कांबळे, बाबू वाडेकर, राजा निकम, अजिंक पेडणेकर, रोहन घाडी, अक्षय वेंगुर्लेकर, स्वागत बांदेकर, बाबू बांदेकर, मनोज बांदेकर, पिंटू जाधव, दिनेश पाटील, निलेश सावंत या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा