पंचशील ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने ठाणे येथे बौध्द समाजाचा कोकणस्थ वधु-वर मेळावा संपन्न
ओरोस
पंचशील ट्रस्ट ओरोस, आदर्शनगर (सिंधुदुर्ग) यांच्यावतीने दिनांक ०८/०२/२०२५ रोजी ठाणे (पश्चिम) या ठिकाणी बोध्द समाजाचा वधु-वर मेळावा संपन्न झाला. यावेळी बौध्द समाजातील ४० ते ५० वधु-वर मुले-मुली उपस्थित होते. तसेच त्यांचे पालकही मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या शुभ प्रसंगी पंचशील ट्रस्टच्या वतीने दिवंगत शिला बलवंत खोटलेकर (शिक्षिका) यांच्या स्मृती प्रित्यर्थ मा. त्रिशला आनंद कदम, कांदळगाव यांचा आदर्श शिक्षिका या नावाचा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मा. पुज्य भन्ते संघरत्न नवी मुंबई तसेच मा. वृंदा पेंडुरकर मा. अजित सोनवडेकर, मा. सिध्दार्थ जंगम, मा. त्रिशला कदम, दिनेश, अमर, शितल व पंचशील ट्रस्टचे अध्यक्ष मा. संजय खोटलेकर (समाज भुषण महाराष्ट्र शासन) त्यानंतर सरनेत्य गाथा घेऊन कार्यकगमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून मा. पराग तांबे होते. तद्नंतर या उपस्थित सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असे घोषित केले.