*डोंगरी विकास आणि जन सुविधा अंतर्गत रस्ते डांबरीकरण व संरक्षक भिंत बांधण्याचा शुभारंभ*
*ग्रामस्थ्यांनी मानले आमदार दीपक केसरकर यांचे आभार*
दोडामार्ग
आज पाल पुनर्वसन (कुडासे खुर्द ) येथे डोंगरी विकास आणि जन सुविधा अंतर्गत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यात आले, दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदरचे काम आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर करून दिले. याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी कुडासे खुर्दच्या प्रथम नागरीक सरपंचा सौ.श्रद्धा भरत नाईक, बाळासाहेब शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेना तालुका सरचिटणीस अमरसिंग राणे, लाडू आयनोडकर, ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र गवस, ग्रामपंचायत सदस्य अमिता राणे, ग्रामपंचायत सदस्य सानवी दळवी, माणिकराव देसाई, रघुवीर गवस, सदाशिव गवस, मनोहर राणे, भरत शिरसाट, गणपत राणे, लक्ष्मण गवस, वासुदेव सावंत, रामचंद्र सडेकर, प्रकाश नाईक, सतीश राणे, सारिका नाईक आदी उपस्थित होते.