आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी “इंटिग्रेटिंग रिसर्च अँड इनोव्हेशन्स इन लाइफ-सायन्स” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जीवशास्त्र विषयातील देशभरातील नामवंत वैज्ञानिक, प्राध्यापक आणि संशोधक सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्दिष्ट संशोधनाची गती वाढवणे, नव्या संकल्पनांना चालना देणे हे आहे. या परिषदेमध्ये जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पर्यावरणशास्त्र, जैवविविधता आणि आधुनिक संशोधन अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. परिषदेत मान्यवरांचे व्याख्यान, संशोधन पेपर सादरीकरण तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन.व्ही. गवळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संशोधकांना या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागाशी संपर्क साधावा
(8010326422) असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.