You are currently viewing कोरे मार्गावर परतीसाठीही सावंतवाडी-एलटीटी स्पेशल

कोरे मार्गावर परतीसाठीही सावंतवाडी-एलटीटी स्पेशल

कोरे मार्गावर परतीसाठीही सावंतवाडी-एलटीटी स्पेशल

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी भराडी देवी जत्रेच्या पार्श्वभूमीवर २१ व २२ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केलेल्या असतानाच भाविकांच्या परतीसाठीही सावंतवाडी- एलटीटी स्पेशल धावणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. या स्पेशलचे आरक्षण ९ फेब्रुवारी रोजी खुले होणार आहे.

०११३४ / ०११३३ क्रमांकाची सावंतवाडी-एलटीटी स्पेशल २३ फेब्रुवारी रोजी धावेल. सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता एलटीटीला पोहचेल. परतीच्या प्रवासात २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता एलटीटी सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.

२० एलएचबी डब्यांची स्पेशल कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे स्थानकात थांबे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा