फोंडाघाट कोंडये करूळ रस्ता होण्यासंदर्भात नामदार नितेश राणे यांना निवेदन सादर
फोंडाघाट
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग .३.२०२२/२३ फोंडाघाट कोंडये करूळ रस्ता कि.मी ०/५४० ते ३/५४० पॅकेज क. MH
२८७३ रक्कम रू. १७१.६७ लक्ष.
वरील रस्ताचे भुमी पुजन समारंभ मा. श्री. रविंद्र चव्हाण सो आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक. १८.०२.२०२४ रोजी संपन्न झाले होते.
सदरचा रस्ता ०/५४० ते ३/५४० असा होणार आहे. सदरचे काम थोडयाच दिवसात सुरू होईल असे सांगण्यात आले. परंतु ० ते ०/५४० हा सुमारे अर्धा कि.मी.चा रस्ता तसाच रहाणार आहे. सदर रस्त्याची आजची परीस्थिती पाहता त्या रस्त्यावर मोठ मोठे खडे पडले असुन रस्ता जिर्ण झालेला आहे. तरी आम्ही आपणास विनंती करतो की हा राहीलेला ० ते ०/५४० मीटरचा रस्ता करण्यात यावा, या बाबत आपण संबंधित शासकीय यंत्रनेला सुचना दयावी जेणे करून सर्वच फोंडा ते कोंडये रस्ता व्यवस्तीत होईल या रस्त्यावर फार मोठया प्रमाणात वाहतुक असुन सदरचा रस्ता न झाल्यास खडयामुळे अपघात होणे संभवते.
आपण या बाबत नक्कीच जातीने लक्ष दयाल यात संदेह नाही व आमची मागणी पुर्ण कराल अशा आशयाचे निवेदन हवेलीनगर मधील ग्रामस्थां तर्फे देण्यात आले होते.
याच विषयास अनुसरून काल दिनांक 8 फेब्रुवारी रोजी नामदार पालकमंत्री नितेश जी राणे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी होकारात्मक संमती दर्शविली आहे. या बद्दल अजित नाडकर्णी यांनी PRO मंत्री श्री.महेश सावंत यांनाही सांगीतले आहे.लवकरच या बाबत निर्णय होईल असे ते म्हणाले