बांदा :
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा अकोला येथे संपन्न झाल्या आहेत. यामध्ये शालेय पॉवरलिफ्टिग स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील वयोगटात कु.प्रणव भिकाजी गवस याने ६६ किलो वजन उचलत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रिडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हयांतून ११ स्पर्धक सहभागी झाले होते.
प्रवीण हा १९ वर्षाखालील गटामध्ये खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा इयत्ता १२ वीचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. प्रणव भिकाजी गवस याने ६६ किलो वजन उचलत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.प्रणव गवस दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल येथील असून बांदा खेमराज मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालयात १९ वर्षाखालील गटा तून इयत्ता बारावीत शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय देवगड स्पर्धेत प्रथम तर कोल्हापुर येथे पार पडलेल्या विभागीय स्तरावर प्रथम आलेला होता. त्याच्या यशाबद्दल शालेय शिक्षक, मार्गदर्शक, गावचे ग्रामस्थ मित्र परिवार यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.