*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाते कल्पने पलिकडचे*
सुखात कवी रमतो
कवितेच्या विश्वात
दुःखातही रमवतो स्वतःला
कवितेच्या विश्वात
अष्टौप्रहर कविता असते
कवीच्या विचार विश्वात
राहतो कवी सतत
कवितेच्या सहवासात
मिळते साथ सोबत
कवीला कवितेची
होते सहचारिणी
जन्म जन्मांतरीची
कवितेचे अन् कवीचे
नाते कल्पने पलिकडचे
सुखदुःखात सोबत राहून
प्रेमाने एकमेकांस जपायचे
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.